bhavnagari mirchi recipe in marathi stuffed chili bharli mirchi bhrwa mirch
हलक्या हिरव्या रंगाच्या आकाराने मोठ्या अशा भावनगरी मिरच्या बाजारात मिळतात. त्या तिखट नसतात.
५-७ मिनिटांत तयार होतात.
साहित्य:
भावनगरी मिरच्या - माणशी २
दाण्याचे कूट
ओलं खोबरं - ऐच्छिक
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर
लसूण - एका मिरचीस २ पाकळ्या या प्रमाणे
गरम मसाला किंवा पावभाजी मसाला
कृती:
- मिरच्या धुवून कोरड्या कराव्या. सुरीने देठापासून टोकापर्यंत मधोमध उभी चीर दयावी. दोन तुकडे करू नये. चीरेतून बोटाने बिया आत ढकलून सारणासाठी थोडी जागा करावी.
- या मिरच्या तिखट नसतात त्यामुळे बिया काढण्याची गरज नाही.
- लसूण ठेचून घ्यावी.
- दाण्याचं कूट, तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर, बारीक चिरून कोथिंबीर आणि ठेचलेली लसूण एकत्र करावे. गरम मसाला किंवा पावभाजीचा मसाला घालावा. आणि खूप मळून एकजीव मिश्रण करावे.
- कांदा-लसूण मसाला घालूनही चविष्ट लागते.
- पावभाजी मसाला घातल्यास लिंबाची गरज नाही कारण त्यात आमचूर पावडर असते. गरम मसाला घातला असेल तर अगदी किंचित लिंबू पिळल्यासारखे करावे. अगदी आंबट नको.
- हे सारण मिरच्यांच्या चिरेत भरावे. पूर्ण भरले गेले पाहिजे.
- फ्राय पॅन वर जराश्या तेलात नेहमीची मोहरी हिंग हळदीची फोडणी करून मिरच्या त्यात शॅलो फ्राय कराव्यात. उलथन्याने उलट सुलट करून दोन्ही बाजूने भाजाव्या. झाकण ठेवावे.
- पटकन शिजतात. ओव्हनमध्ये ग्रिल करूनही बनवू शकतो.
ह्या भरलेल्या मिरच्या भाकरी किंवा खिचडीसोबत मस्त लागतात.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.