Tags: upvasache thalipeeth, sabudanyache thalipeeth, उपासाचे थालीपीठ, साबुदाण्याचं थालीपीठ
Sabudana thalipeeth |
साबुदाणा थालीपीठ साहित्य:
भिजवलेले साबुदाणे
उकडलेले बटाटे
शेंगदाण्याचं कूट
तिखट मीठ जिरेपूड साखर
हिरवी मिरची
तळण्यासाठी तूप किंवा तेल
साबुदाण्याच्या थालीपीठाची कृती :
उकडलेले बटाटे व्यवस्थित कुस्करावे.
रात्रभर भिजवलेल्या साबुदाण्यात कुस्करलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, तिखट मीठ जिरेपूड साखर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत.
गरज पडल्यास जरासे पाणी घेऊन कणिक मळतो तसे मळावे.
एक गोळा घेऊन नेहमीप्रमाणे थापावे आणि मध्यभागी छिद्र करावे
तव्यावर दोन्ही बाजूनी झाकण ठेवून भाजावे.
याचप्रमाणे साबुदाणा वडा सुद्धा बनवता येतो.
उपासासाठी इतर प्रकारेही चटण्या करता येतात.
एक गोळा घेऊन नेहमीप्रमाणे थापावे आणि मध्यभागी छिद्र करावे
तव्यावर दोन्ही बाजूनी झाकण ठेवून भाजावे.
याचप्रमाणे साबुदाणा वडा सुद्धा बनवता येतो.
उपवासाचे थालीपीठ मिरचीच्या चटणीत दही कालवून किंवा उपासाच्या शेंगदाणा चटणीसोबत खावेत.
अतिसोपी दही चटणीदेखील चांगली लागते. वडे तिखट झाले असतील तर उपवासाची काकडीची कोशिंबीर करावी.
उपासासाठी इतर प्रकारेही चटण्या करता येतात.