Tags: Upvasachi bhaji, upasachi batatyachi bhaji, aalo ki sabji vrat ke liye, उपवासाची बटाट्याची भाजी, जीरा आलू, आलू जिरा, aaloo jira, aloo jeera, उपासाची बटाटा भाजी, 

उपासाची बटाटा भाजी (कोरडी) बहुतेक सर्व घरांमध्ये उपासाच्या दिवशी फराळासाठी बनवली जाते.

उपवासाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: 

बटाटे - चार ते पाच, मध्यम आकाराचे
ओलं खोबरं

हिरवी मिरची, आले
तूप, जिरे, मीठ, साखर, लिंबू, चालत असल्यास कोथिंबीर

आलू जिरा रेसिपी: 

  • सर्वप्रथम बटाटे संपूर्ण उकडून घ्यावेत. बटाटे उकडताना मधोमध चाकुने छेद दिल्यास आतपर्यंत उकडले जातात. 
  • गरम बटाटे नळाच्या पाण्याखाली धरल्यास पटकन थंड होतात आणि साले ही सहज सुटतात. 
  • या बटाट्यांच्या लहान लहान आकाराच्या चौकोनी फोडी कराव्यात. 
  • हिरव्या मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे करावेत. 
  • आले ठेचून घ्यावे. 
  • उपासाची चटणी करता येते उपासाची चटणी वापरली तर अजूनच छान चव येऊ शकते. 
  • उपवासाच्या चटणीचे तीन प्रकार आहेत. उपवासाची कोथिंबीर चटणी, उपवासाची हिरव्या मिरच्यांची चटणी, शेंगदाण्याची उपवासाची चटणी - यापैकी कुठलीही चटणी वापरली तरी चालेल. शेंगदाण्याची  चटणी वापरल्यास भाजीला लाल रंग येतो. 
  • उकडलेल्या बटाट्याच्या फोडींना वरीलपैकी कोणतीही एक चटणी व्यवस्थित तोडावी चोळून घ्यावी. 
  • यानंतर त्याच फोडींवर चवीपुरते मीठ, जराशी साखर आणि लिंबू रस घालावा. हाताने व्यवस्थित मिक्स करावे.
  • चटणी तयार नसेल तर फोडींवर हिरव्या मिरच्यांचे अगदी बारीक तुकडे, आल्याचा ठेचा, मीठ साखर लिंबू घालून ढवळावे. 
  • कढईमध्ये चमचाभर तूप घेऊन त्यात जिरे घालावे. घातल्यानंतर हिरव्या मिरचीचे एक दोन तुकडे फोडणीत घालावेत. 
  • तुपाची फोडणी देत असताना शक्यतो त्यात डायरेक्ट लाल तिखट घालू नये. 
  • या फोडणीत बटाट्याचे मिश्रण घालून कालथ्याने अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ढवळावे. 
  • गॅस बारीक ठेवावा आणि अगदी दोनच मिनिटे कढईवर झाकण ठेवावे. नंतर गॅस बंद करून झाकणात पाच मिनिटे तसेच राहू द्यावे. 
  • वाढण्यापूर्वी ओले खोबरे घालावे.


Tags: Upvasachi bhaji, upasachi batatyachi bhaji, aalo ki sabji vrat ke liye, उपवासाची बटाट्याची भाजी, जीरा आलू, आलू जिरा, aaloo jira, aloo jeera, उपासाची बटाटा भाजी

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.