Tags: Vangyache bharit, bengan bharta, vaangyach bharit kasa karava, bhartache vange, वांग्याचं भरीत, bhareet 

वांगी बऱ्याच प्रकारची मिळतात. त्यापैकी भरताचे वांगे हे आकाराने सर्वात मोठे असते. काहीजण याची भरताची वांगी उभट निवडतात. पण उभट वांग्याचे काप करावेत.
वांग्याचं भरीत हा पटकन होणारा पदार्थ आहे. कोशिंबीरीप्रमाणे किंवा भाजीप्रमाणे वांग्याचे भरीत पोळीसोबत खाता येते. वांग्याचे भारताचे पुष्कळ प्रकार आहेत प्रत्येक जण वांग्याचे भरीत वेगवेगळ्या प्रकारांनी करतो. परंतु उत्तम चव येण्यासाठी कमी बिया असलेली वांगी निवडावी.

भरीत करण्यासाठी वांगी भाजून घेतली जातात. चुलीवर भरलेले वांगे खूपच चविष्ट लागते. चूल सर्वत्र उपलब्ध नसल्याने ही वांगी साध्या गॅसवर किंवा ओव्हनमध्ये ही भाजता येतात.
वांग्याच्या भरता चे प्रकार अनेक आहेत, जसे वांग्याचे कांदा घालून केलेले भरीत, बिना कांद्याचे भरीत, कच्च्या कांद्याचे भरीत, वांग्याचे चिंचगुळाचे भरीत. या वांग्याच्या भरीताची रेसिपी त्या त्या लिंक वर आहे. इथे आपण नेहमीचे भरीत पाहू.

वांग्याच्या भरताचे साहित्य

भरताची वांगी - दोन मोठ्या आकाराची
चिंचोके काढलेली चिंच - लिंबाच्या आकाराएवढी
गुळ - चिंचेच्या दुप्पट
कांदा - एक बारीक चिरून
दाण्याचे भरड कूट - अर्धी वाटी किंवा थोडेसे जास्त
तिखट किंवा हिरवी मिरची, मीठ आणि फोडणीचे इतर साहित्य


वांग्याचे चिंचगुळाचे भरीत कसे करावे

  • भरताची वांगी स्वच्छ धुवून कोरडे करावीत. अगदी एक थेंबभर तेल बोटाने वांग्यावर चोपडावे. 
  • यानंतर काहीजण वांग्याला टोचे मारतात. असे करण्याची फारशी गरज नसते. सवय असेल तर चाकूने किंवा fork ने वांग्यावर टोचे मारावेत. अखंड वांगे तसेच गॅसवर ठेवले तरी चालते. 
  • देठापासून टोकापर्यंत मागे संपूर्ण भाजले गेले पाहिजे. भाजताना गॅसला टेकलेली बाजू चटकन मऊ पडते. वांगे सतत फिरवत रहावे. त्यामुळे ते सर्व बाजूनी समान भाजले जाते. 
  • टोचे मारले असतील तर वांग्यातून वाफा येऊ लागतात. टोचे मारले नसतील तर वांग्याची काळी साल तडकते आणि वाफा बाहेर येतात. 
  • पूर्णपणे भाजले गेल्यावर वांगे मऊ पडते. ते वांगे एका ताटात काढावे. गरम असतानाच त्याची साले काढून टाकावीत कारण थंड झाल्यावर ती चिकटतात. 
  • वांग्याचे देठ हातात धरून चालून वांग्यावर उभे उभे चिरे द्यावेत. नंतर पूर्णपणे वांगे चाकूने बारीक चिरावे. 
  • भरतामध्ये फोडी नसतात, त्यामुळे चिरलेल्या वांग्याला कोणताही आकार नसावा. 
  • त्याचा लगदा एका मोठ्या भांड्यात काढावा. 
  • वांगी भाजून होईपर्यंत चिंच गुळाचे पाणी तयार करण्यास घ्यावे. 
  • साधारण अर्ध भांड पाणी घेऊन त्यात चिंचोके नसलेली चिंच हाताने कोळावी. 
  • चिंचेच्या कोळात गुळ घालून हाताने मळून  विरघळवावा. गरज पडल्यास अजून थोडे पाणी घालावे.
  • मध्यम आकाराचा एक कांदा अतिशय बारीक चिरावा. कांदा आपल्याला फोडणीत घालायचा नाही तो कच्चा ठेवायचा आहे. 
  • आवडत असेल तर हिरव्या मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे सुद्धा करून ठेवावेत. 
  • वांग्याचा लगदा असलेल्या भांड्यात हा कांदा, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. 
  • त्यानंतर त्यात चिंच गुळाचे पाणी घालावे. सर्व मिश्रण ढवळून एक एकत्र करावे. 
  • यानंतर त्याने त्यात थोडे थोडे दाण्याचे कुट घालून ढवळावे. दाण्याच्या कूटामुळे मिश्रण एकजीव होते आणि पातळ होत नाही.
  • चवीनुसार मीठ घालावे. तिखट घालावे. 
  • तिखट घातल्यावर ढवळू नये कारण या तिखटावरच फोडणी द्यायची आहे. हिरव्या मिरच्या असतील तर मात्र तिखट घालू नये. 
  • एका पळीत तेल गरम करून त्यात नेहमीच्या फोडणीचे साहित्य म्हणजेच मोहरी जिरे हिंग हळद घालावी. 
  • ही फोडणी गरम असतानाच वांग्यावरील तिखटावर ओतावी. मस्त खमंग वास येतो. आणि तिखट काळे पडत नाही. 


सर्व परत ढवळले कि झालं वांग्याचं भरीत तयार!
चिंच आणि गूळ असल्यामुळे या वांग्याच्या भरताला मस्त आंबट गोड चव येते. फोडणीत लसूण करण्याची अजिबात गरज नाही कारण त्यामुळे वांग्याची मुळात असलेली चव बिघडते. जे लोक कांदा खात नाहीत, त्यांनी कांदा नाही घातला तरी चालेल. 
भरीत तयार झाले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 




Tags: Vangyache bharit, bengan bharta, vaangyach bharit kasa karava, bhartache vange, वांग्याचं भरीत, bhareet 








0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.