Tags: साबुदाण्याचे वडे, sabudana ke vade, साबुदाना, sago vada, food for fast, upvasache padarth, vrat, साबूदाना वड़ा, sabudana tikki,
Sabudana vada |
साबुदाण्याच्या वड्याचे साहित्य :
भिजवलेले साबुदाणे
उकडलेले बटाटे
शेंगदाण्याचं कूट
तिखट मीठ जिरेपूड साखर
हिरवी मिरची
तळण्यासाठी तूप किंवा तेल
साबुदाणा वडा कृती :
उकडलेले बटाटे व्यवस्थित कुस्करावे.
रात्रभर भिजवलेल्या साबुदाण्यात कुस्करलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, तिखट मीठ जिरेपूड साखर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत.
गरज पडल्यास जरासे पाणी घेऊन कणिक मळतो तसे मळावे.
कढईत शेंगदाण्याचे तेल किंवा तूप कडकडीत गरम करून २ चमचे मोहन घालावे.
साबुदाण्याचे गोलाकार वडे थापून मध्यभागी छिद्र करावे व एक एक वडा नीट तळावा.
याच प्रमाणे उपासाचे थालीपीठ करता येते.
याच प्रमाणे उपासाचे थालीपीठ करता येते.
साबुदाण्याचे वडे मिरचीच्या चटणीत दही कालवून किंवा उपासाच्या शेंगदाणा चटणीसोबत खावेत.
दही चटणीदेखील चांगली लागते. वडे तिखट झाले असतील तर उपवासाची काकडीची कोशिंबीर करावी.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.