Tags: khamang Kakdi koshimbir Cucumber raita for fast upvas recipe in marathi, उपासाची कोशिंबीर , खमंग काकडी, उपवासाची कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर
५ मिनिटे - ४ माणसांसाठी
उपासाची काकडी कोशिंबीर साहित्य:
ताज्या गोड काकड्या - ४-५
दाण्याचं कूट - २ चमचे किंवा ओलं खोबरं
हिरव्या मिरच्या - १-२
जरासा चिंचेचा कोळ
मीठ साखर तूप जिरे हिंग
उपासाच्या कोशिंबीची कृती:
साल काढून काकड्या चोचवून घाव्यात.
त्यात दाण्याचं कूट किंवा ओलं खोबरं, जरासा चिंचेचा कोळ घालावा.
आवडत असल्यास कमी तिखट हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सगळ्यात शेवटी मीठ साखर घालावे.
नीट ढवळावे.
उपवासासाठी करायची झाल्यास तूप जिरे मिरचीची फोडणी वरून घालावी.
उपवास नसेल तर त्या फोडणीत हिंग घालावा.
चिंचेच्या ऐवजी दही सुद्धा घालता येतं.
Tags: bhajaniche thalipeeth, bhajniche thalipith recipe in marathi, multigrain flour, multi-grain roti, bhajni che dhapate, थालीपीठ थालिपीट थालपीठ थालपीट
Bhajaniche thalipith
भाजणी तयार असल्यास प्रत्येक थालीपिठ २ मिनिटात तयार होते.
वेगवेगळ्या प्रकारची भाजकी धान्ये यात वापरली गेली आहेत. त्यामुळे भाजणीचे थालीपीठ अतिशय पौष्टिक आहार आहे. लोणी किंवा दह्यासारख्या स्निग्ध पदार्थाबरोबर थालीपीठ खाल्ले जाते. त्यामुळे रुक्षपणा जाणवत नाही.
भाजणीचे थालीपीठ कसे करावे ते इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
Bhajani che Thalipith recipe in English, Multi-grain roti
भाजणीचे थालीपीठ साहित्य :
थालीपीठाची भाजणी (२ वाट्यात ३ मध्यम थालीपीठे होतात.) तिखट,मीठ, हिंग, हळद, तीळ, कोथिंबीर, कांदा/कोबी
भाजणीच्या थालीपीठाची कृती:
मोठ्या वाडग्यात भाजणीचं पीठ घेऊन त्यात तिखट,मीठ, हिंग, हळद, तीळ, ओवा घालावे.
कांदा उभा बारीक चिरावा. कांदा नसेल तर कोबीही उभी बारीक चिरून घातलेली चालते.
कांदा /कोबी पिठात घालावी. पाणी घालून भिजवावे. एकदम पाणी घालू नये.
पोळ्यांच्या कणकेपेक्षा जास्त पाणी लागत कारण भाजकी धान्ये पाणी शोषून घेतात.
प्लास्टिक पेपरवर पिठाचा एक गोळा घेऊन हातानेच गोल गोल थापावे.
हाताला सहसा चिकटत नाही. अगदीच चिकटल्यास थेंबभर तेल लावावं.
वरून तीळ पेरावेत.
नॉनस्टिक ताव गरम करून अगदी किंचित तेल लावावे. व त्यावर थालीपीठ टाकावे.
चमच्याने ३-४ टोचे द्यावेत. तव्याला तेल लावताना मी अर्ध्या कांद्याला तेल लावून तोच तव्यावरून फिरवते.
झाकण ठेऊन शिजू द्यावे. साधारण ४० सेकंदात एक बाजू भाजली जाते.
झाकण काढून उलटावे. झाकण न ठेवता भाजावे. झालं तयार.
लोणी, दही, किंवा ओली चटणी सोबत खायला द्यावे. English version of the recipe is available at Bhajani che Thalipith recipe in English, Multi-grain roti
Tags: bhajaniche thalipeeth, bhajniche thalipith recipe in marathi, multigrain flour, multi-grain roti, bhajni che dhapate, थालीपीठ थालिपीट थालपीठ थालपीट
Tags: naralachya dudhatil bharli bhendi bhaji, stuffed lady finger in coconut milk recipe in marathi, okra subzi, bhindi ki sabzi, bhendichi bhaji, bhindi with gravy, bharwa bhindi
२५ मिनिटे - ४ जणांसाठी
English version at - Stuffed bhindi in coconut milk gravy
Tags: Kachha aam achar, kairi lonche, kairiche lonache, raw mango pickle recipe in marathi, कैरीचं लोणचं, आंबा लोणचे
कैरीचं लोणचं अनेक प्रकारांनी करता येतं. माझी आई ज्या ज्या प्रकारे करायची त्यातल्या त्यात मला हीच पद्धत सोपी वाटली. मन लावून केलं, पाणी उडू न देण्याची काळजी घेतली कि छान टिकतं लोणचं. खालील प्रमाण वर्षभराच्या लोणच्याचे आहे. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात करावे व proportion लिहून ठेवावे. पटकन विसरलं जातं. चवीप्रमाणे तिखट मीठ ऍडजस्ट करता येतं. To read in English - Raw mango pickle recipe कैरीच्या विविध प्रकारांच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा.