aloo tikki, potato pattice batata patis simple pattice batatyache patties street food mumbai chat

साहित्य:

बटाटे - ४ मध्यम 
लसूण आलं लिंबू 
कोथिंबीर
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर 
ब्रेडक्रम्स / तांदुळाची पिठी / कॉर्नफ्लोर / ब्रेडचे स्लाइस - यांपैकी काहीतरी एक 
बारीक रवा - २ मोठे चमचे 

कृती:

  • बटाटे मऊ उकडावेत व साले काढून मॅश करावेत. 
  • ग्राईंडरमधून आलं-लसूण-जिऱ्याची पेस्ट करावी.
  • मॅश केलेल्या बटाट्यात ही पेस्ट, तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर व लिंबू घालून हाताने नीट एकजीव करावे. 
  • या मिश्रणाचे चपटे गोळे करायचे आहेत. आकार नीट व्हावा यासाठी ब्रेडक्रम्स / तांदुळाची पिठी / कॉर्नफ्लोर यापैकी कोणतीही एक गोष्ट लागते. पण जर यापैकी काहीच न घालताही आकार नीट गोल होत असेल व चिकटत नसेल तर घालू नये. 
  • आधी हाताला तेल लावावे आणि एक एक भाग मिश्रण घेऊन त्यात वरील पैकी एक गोष्ट मिसळून गोल चापट आकार द्यावा. 
  •  हे गोळे बारीक रव्यात घोळवावेत. 
  • पसरट तव्यावर किंवा फ्रायपॅनमध्ये शॅलोफ्राय करावे, आधी पॅनला तेल लावून पॅटीस ठेवावे. जरा वेळाने उलटवावे. बारीक रव्यामुळे क्रिस्पी सोनेरी होते. 
ही पॅटीसची बेसिक पद्धत आहे. उकडलेल्या बटाट्याऎवजजी बटाट्याची भाजी (उरलेली किंवा केलेली 😎) वापरून पॅटीस करता येते. 
खजुराच्या चटणीसोबततिखट चटणीसोबत खावे.
बटाट्याचे स्टफ्ड पॅटीस करण्यासाठी लिंकवरची पोस्ट वाचावी. 
Potato pattice batatyache patties mumbai chat street food batata cutlet
Aloo tikki
पॅटीसचे अजूनही काही प्रकार आहेत - 
मटार पॅटीस 
पोह्यांचे पॅटीस 
मक्याचे पॅटीस 



Related Posts:

  • बटाट्याचे पॅटीस, Potato Pattice, Aloo tikki aloo tikki, potato pattice batata patis simple pattice batatyache patties street food mumbai chat साहित्य: बटाटे - ४ मध्यम  लसूण आलं लिंबू  कोथिंबीर तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर  ब्रेडक्रम्स … Read More
  • सुरण कबाब Suran Kabab fried item Tags: Suranache padarth kabab recipe, yam, jimikand, elephant foot yam, suran recipes, suran vada, सुरण, सुरणाचे पदार्थ  २० मिनिटे - ६ जणांसाठी To read in English - Suran Kebab Recipe सुरणाचे कबाब साहित्य:… Read More
  • बटाट्याचे स्टफ्ड पॅटीस, Stuffed Aloo Tikki, Stuffed Potato Pattice stuffed aloo tikki, batatyache stuffed pattice, stuffed potato pattice, batata patties patis, street food mumbai chat साहित्य: बटाट्याचे साधे पॅटीस बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य↴   बटाटे - ४ मध्यम   लसूण … Read More
  • रगडा पॅटीस, Ragda Pattice Tags: Ragada Ragda Pattice recipe in marathi mumbai chat street food patties patis, ragda patis साहित्य: पांढऱ्या वाटण्याचा रगडा  बटाट्याचे साधे पॅटीस किंवा बटाट्याचे स्टफ्ड पॅटीस  खजुराची चटणी  कोथ… Read More

3 comments:

  1. सोपे वाटतात पण करून बघायला हवेत.छान झटपट रेसीपी आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. बटाटा पॅटीस अगदीच सोपे आहेत. नक्कीच करून पहा. पिझ्झाचे जे seasoning असतं ना ते घातलं तर मस्त चटकमटक होतील.

      Delete

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

519,632

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.