Tags: कोबीची भजी, Cabbage bhujiya, Cabbage pakoda,
कांदाभजी खावीशी वाटली तर कोबीची भजी उत्तम पर्याय आहे.
खाली लिहिलेली कृती नेहमीची, पाणी न वापरता केलेली आहे.
 |
Cabbage Pakore |
पत्ता कोबीची भजी साहित्य :
बारीक आणि उभी चिरलेली कोबी
बेसन, तेल
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर,
ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर
कोबीच्या भजीची रेसिपी :
- कोबीची टोके कापून उभा पातळ चिरावा. चिरल्यावर हाताने मोकळा करावा.
- त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करावे.
- दहा मिनिटे तसेच ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटते, या सुटलेल्या पाण्यात बसेल इतकेच बेसन त्यात हळू हळू घालत हाताने कालवीत राहावे.
- यावर कडकडीत तेलाचे २ चमचे मोहन घालावे.
- हातानी थोडे थोडे मिश्रण उचलून कोणताही आकार न देता तेलात तळावे. कोबी उभी चिरलेली असल्यानी भज्यांना टोके येतात.
ही भजी कधी कधी कढीत घालून कढी-पकोडे बनवता येतात.
सोबत फोडणीची ओली मिरची द्यावी.
Tags: कोबीची भजी, Cabbage bhujiya, Cabbage pakoda
Related Posts:
व्हेज ब्रेड पकोडे, Bread Pakoda, Veg Bread Pakoda, Bread Pattice
Tags: Veg Bread Pakoda Pakora Bread Pattice recipe in marathi
हासुद्धा एक सहजपणे सर्वत्र उपलब्ध पदार्थ आहे. ब्रेडच्या पदार्थांशिवाय स्नॅक्स काउंटर पूर्ण होत नाही.
साहित्य:
बटाटे - उकडून भाजी
ब्रेड, बेसन, तेल
त… Read More
मिरचीची भजी, Green Chilli Bhajiya Pakoda
Tags: Green chilli Mirchi Bhaji Recipe in Marathi, mirchyanchi bhaji, talnichya mirchya talanichi mirchi, मिरच्यांची भजी, तळणीच्या मिरचीची भजी
बरंच गोड गोड खाऊन झालं, सारखी कांद्याची बटाट्याची भजी खाल्ली की थोडा चवीत … Read More
ब्रेड पोटली, Bread Potali
Tags: Bread Potali, Stuffed bread pakora, Stuffed bread pakoda recipe in marathi.
साहित्य:
बटाटे - भाजीसाठी
मोड आलेली कडधान्ये, टोमॅटो, कोबी, मटार, गाजर, बीट वगैरे
बेसन, तेल
तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा,… Read More
कांदाभजी, कांद्याची भजी, पकोडे Onion Pakode, Pyaaj Pakode, Kandabhaji
Kanda bhaji Kandabhaji, Onion bhaji, Pyaaj ke pakode pakora recipe in marathi
कांद्याची भजी, चहा आणि पावसाळा !! Do you really need any more explanation?? 😊 ही भजी दोन पद्धतींनी केली जातात - उभी चिरून व गोल काप करून.
खाली ल… Read More
फळभाज्यांची भजी, कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी Vegetable bhaji pakode, Batata Simla mirch Brinjal Banana Gourds bhaji pakoda
Tags: Vegetable Pakode recipes in marathi, फळभाज्यांची भजी, कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी Vegetable bhaji pakode, Batata Simla… Read More
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.