Tags: कोबीची भजी, Cabbage bhujiya, Cabbage pakoda, 

कांदाभजी खावीशी वाटली तर कोबीची भजी उत्तम पर्याय आहे.
खाली लिहिलेली कृती नेहमीची, पाणी न वापरता केलेली आहे.
Cabbage Pakore
























पत्ता कोबीची भजी साहित्य :

बारीक आणि उभी चिरलेली कोबी 
बेसन, तेल
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर,
ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर

कोबीच्या भजीची रेसिपी : 

  • कोबीची टोके कापून उभा पातळ चिरावा. चिरल्यावर हाताने मोकळा करावा.
  • त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करावे.
  • दहा मिनिटे तसेच ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटते, या सुटलेल्या पाण्यात बसेल इतकेच बेसन त्यात हळू हळू घालत हाताने कालवीत राहावे.
  • यावर कडकडीत तेलाचे २ चमचे मोहन घालावे.
  • हातानी थोडे थोडे मिश्रण उचलून कोणताही आकार न देता तेलात तळावे. कोबी उभी चिरलेली असल्यानी भज्यांना टोके येतात.

ही भजी कधी कधी कढीत घालून कढी-पकोडे बनवता येतात.
सोबत फोडणीची ओली मिरची द्यावी.

Tags: कोबीची भजी, Cabbage bhujiya, Cabbage pakoda

Tags : Karela ki sabji, karalyachi bhaji, karlyache kaap, karela fry, bittergourd subzi, कारली, karalyachya kacharya kachrya, karla 

कारल्याची परतून केलेली भाजी अजिबात कडू लागत नाही. कारल्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी काही उपाय "कारल्याचा कडूपणा कसा काढावा" इथे लिहिले आहेत.

Karela ki sabji, karalyachi bhaji, karlyache kaap, karela fry, bittergourd subzi
Karela Fry 
















कारल्याच्या काचऱ्या साहित्य :

कारली
तेल आणि फोडणीचे साहित्य
मीठ, लिंबू

कारल्याची परतलेली भाजी : 

कारली स्वच्छ धुवून त्यावरचे काटे सुरी किंवा चमच्याने खरवडून काढा.
मधोमध उभी चिरून आतील बिया काढा. (या बिया टाकून न देता त्याची चटणी करता येते.)
C आकाराच्या काचऱ्या चिराव्यात. त्यांना किंचित मीठ लावून ठेवावे.
कढईत तेल तापल्यावर मोहरीची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. हिंग जरा जास्त घालावा.
कारल्याच्या काचऱ्या टाकून भरपूर परतावे. झाकण नको.
परतताना कोथिंबीर घालावी, धणेपूड घालावी आणि मीठ घालावे.
आवडत असल्यास अर्धा चमचा शेंगदाण्याचे किंवा तिळाचे कूट घातले तरी चालेल.
भरपूर परतल्यावर सगळा कडूपणा निघून जातो. आणि भाजी क्रिस्पी लागते.

Tags : Karela ki sabji, karalyachi bhaji, karlyache kaap, karela fry, bittergourd subzi, कारली, karalyachya kacharya kachrya

Tags: upvasache thalipeeth, sabudanyache thalipeeth, उपासाचे थालीपीठ, साबुदाण्याचं थालीपीठ 

upvasache thalipeeth, sabudanyache thalipeeth, उपासाचे थालीपीठ, साबुदाण्याचं थालीपीठ
Sabudana thalipeeth




















साबुदाणा थालीपीठ साहित्य:
भिजवलेले साबुदाणे 
उकडलेले बटाटे
शेंगदाण्याचं कूट 
तिखट मीठ जिरेपूड साखर 
हिरवी मिरची 
तळण्यासाठी तूप किंवा तेल 

साबुदाण्याच्या थालीपीठाची कृती :

उकडलेले बटाटे व्यवस्थित कुस्करावे. 
रात्रभर भिजवलेल्या साबुदाण्यात कुस्करलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, तिखट मीठ जिरेपूड साखर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. 
गरज पडल्यास जरासे पाणी घेऊन कणिक मळतो तसे मळावे. 
एक गोळा घेऊन नेहमीप्रमाणे थापावे आणि मध्यभागी छिद्र करावे
तव्यावर दोन्ही बाजूनी झाकण ठेवून भाजावे. 


याचप्रमाणे साबुदाणा वडा सुद्धा बनवता येतो. 
उपवासाचे थालीपीठ मिरचीच्या चटणीत दही कालवून किंवा उपासाच्या शेंगदाणा चटणीसोबत खावेत. 

अतिसोपी दही चटणीदेखील चांगली लागते. वडे तिखट झाले असतील तर उपवासाची काकडीची कोशिंबीर करावी. 

उपासासाठी इतर प्रकारेही चटण्या करता येतात.

उपवासाची कोशिंबीर करता येते. 

उपासाची हिरव्या मिरच्यांची चटणी

उपवासाची शेंगदाणा चटणी

उपवासासाठी कोथिंबीर चटणी

अननसाची उपवासाची कोशिंबीर


Tags: upvasache thalipeeth, sabudanyache thalipeeth, उपासाचे थालीपीठ, साबुदाण्याचं थालीपीठ

Tags: साबुदाण्याचे वडे, sabudana ke vade, साबुदाना, sago vada, food for fast, upvasache padarth, vrat, साबूदाना वड़ा, sabudana tikki, 


साबुदाण्याचे वडे, sabudana ke vade, साबुदाना, sago vada, food for fast, upvasache padarth, vrat, साबूदाना वड़ा, sabudana tikki
Sabudana vada




















साबुदाण्याच्या वड्याचे साहित्य :

भिजवलेले साबुदाणे 
उकडलेले बटाटे
शेंगदाण्याचं कूट 
तिखट मीठ जिरेपूड साखर 
हिरवी मिरची 
तळण्यासाठी तूप किंवा तेल 

साबुदाणा वडा कृती :

उकडलेले बटाटे व्यवस्थित कुस्करावे. 
रात्रभर भिजवलेल्या साबुदाण्यात कुस्करलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, तिखट मीठ जिरेपूड साखर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. 
गरज पडल्यास जरासे पाणी घेऊन कणिक मळतो तसे मळावे. 
कढईत शेंगदाण्याचे तेल किंवा तूप कडकडीत गरम करून २ चमचे मोहन घालावे. 
साबुदाण्याचे गोलाकार वडे थापून मध्यभागी छिद्र करावे व एक एक वडा नीट तळावा. 

याच प्रमाणे उपासाचे थालीपीठ करता येते. 

साबुदाण्याचे वडे मिरचीच्या चटणीत दही कालवून किंवा उपासाच्या शेंगदाणा चटणीसोबत खावेत. 
दही चटणीदेखील चांगली लागते. वडे तिखट झाले असतील तर उपवासाची काकडीची कोशिंबीर करावी. 

Tags: साबुदाण्याचे वडे, sabudana ke vade, साबुदाना, sago vada, food for fast, upvasache padarth, vrat, साबूदाना वड़ा, sabudana tikki,

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.