चमच्याने Tags: कारल्याची दाण्याचं कूट घालून केलेली भाजी, कारल्याच्या काचऱ्या, karele ki sabzi, karlyachi bhaji, karla, bittergourd vegetable, karla and danyache kut

परतवलेल्या भाजीप्रमाणे कारल्याची शेंगदाण्याचे कूट घालून कोरडी आणि मोकळी भाजीही करता येते.
शेंगदाणे असल्याने कारल्याची भाजी कडू होत नाही त्यामुळे कडू चव काढण्यासाठी काही विशेष प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.
तरीही माहितीसाठी, कारल्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी काही उपाय "कारल्याचा कडूपणा कसा काढावा" इथे लिहिले आहेत.


(२ माणसांसाठी )

कारल्याची भाजी साहित्य: 

कारली - ५ ते ६ मध्यम आकाराची
दाण्याचे कूट - अर्धी वाटी
चिंच - लिंबाइतकी
गूळ - १ ते दीड चमचा
काळा मसाला किंवा कांदा - लसूण मसाला 
कोथिंबीर
फोडणीचे साहित्य
लसूण - ऐच्छिक, ३-४ पाकळ्या
आमचूर पावडर - १ चमचा

कारले भाजीची रेसिपि: 


  1. सर्वप्रथम कारली स्वच्छ धुवून कोरडी करावीत. चमच्याने किंवा सुरीने कारल्याची साले खरवडावीत. थोडा हिरवा भाग राहिला तरी चालतो. 
  2. मधोमध उभे चिरावे. कारल्याच्या बिया बाजूला कराव्यात. कारल्याचं बी टाकून देऊ नये. त्या बियांची चविष्ट चटणी करता येते. त्याची रेसिपी कारल्याची चटणी इथे लिहिली आहे
  3. कढईत नेहमीप्रमाणे तेल, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. 
  4. लसूण आवडीप्रमाणे घालावे. पण तरीही खूप जास्त लसूण नसावा कारण त्यामुळे कारल्याची मूळ चव नाहीशी होते. 
  5. गोडा मसाला किंवा काळा मसाला या भाजीला चांगला लागतो. नसल्यास नेहमीचा गरम मसाला वापरला तरी चालेल. कांदा - लसूण मसाला वापरणार असाल तर फोडणीमध्ये लसूण अगदीच कमी घालावी. 
  6. यानंतर फोडणीत कारल्याचे काप टाकावेत आणि मीठ घालून परतावेत. 
  7. पाणी अजिबात घालू नये. कढईवर झाकण ठेवावे. साधारण ५ ते ७ मिनिटात भाजी अर्ध्याधिक शिजते. 
  8. शेंगदाण्याचे अर्धी वाटी कूट या भाजीत घालावे. ढवळताना असे ढवळावे कि ते कारल्याच्या सगळ्या फोडींना सारखेच लागेल. फोडी तुटल्या नाही पाहिजेत. 
  9. चमचाभर गूळ चिरून किंवा हाताने मोकळा करून घ्यावा. 
  10. २ मिनिटे परतल्यावर त्यात हा गूळ घाला आणि नीट मिक्स करावे. झाकण ठेऊन एक वाफ आणली कि भाजी तयार. 
  11. कोथिंबीर घालावी. हि भाजी अजिबात कडू लागत नाही. आमचूर पावडर वापरली नाही तरी चालते. अगदी घालायचीच असेल तर कारली परतताना घालावी. 


Tags: कारल्याची दाण्याचं कूट घालून केलेली भाजी, कारल्याच्या काचऱ्या, karele ki sabzi, karlyachi bhaji, karla, bittergourd vegetable, karla and danyache kut


1 comment:

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.