Tags: आंब्याची डाळ आंबेडाळ कैरीची डाळ डाळकैरी, ambyachi dal, ambe dal, daalkairi recipe
चैत्रगौरीच्या नवरात्रीला हमखास बनवला जाणारा हा पदार्थ आहे. चैत्र महिन्यात बाजारात कैर्या येऊ लागतात.आंब्याच्या डाळीसाठी लागणारे साहित्य:
मध्यम आंबट चव असलेली कैरीचणाडाळ - दोन वाट्या
खवलेला नारळ - एक वाटी
तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, मीठ
आलं, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर
आंबेडाळ रेसिपी
- कैरी निवडताना मऊ कैरी घेऊ नये. अगदी गोड सुद्धा नसावी.
- चणाडाळ नीट धरून कमीत कमी चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवावी. ही डाळ आपण शिजवणार नाही त्यामुळे ती व्यवस्थित भिजली गेली पाहिजे.
- कैरीची साल काढून किसणीने किसून घ्यावे. दोन वाटी चण्याच्या डाळीला कैरीचा एक वाटी किस पुरेसा होतो.
- मिक्सरच्या भांड्यात आलं, हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं भरड ग्राइंड करावे. खोबरं सगळं घेऊ नये काही खोबरे आपण नंतर मिक्स करणार आहोत.
- डाळीतून पाणी काढून टाकावे आणि ते मिक्सर मधून हलकीशी मोडून घ्यावी. डाळ संपूर्ण मोडायची नाही. Grind करताना अंदाज घेऊन मीठ घालावे. यामुळे ते संपूर्ण मिश्रणाला समप्रमाणात लागेल.
- यानंतर खोबऱ्याचे मिश्रण आणि अर्धवट मोडलेली चणाडाळ यामध्ये कैरीचा किस घालावा आणि मिक्सर मधून अजून थोडेसे फिरवावे.
- याची चव थोडीतरी आंबट लागली पाहिजे. मिक्सरमधून मिश्रण बाहेर काढून त्यात थोडेसे ओले खोबरे वरून घालावे आणि हाताने मिश्रण व्यवस्थित एकजीव करावे.
- यानंतर छोट्या कढईमध्ये तेलाची फोडणी करावी. नेहमीच्या प्रमाणापेक्षा तेल थोडे जास्तच घ्यावे. त्यात मोहरी टाकून तडतडल्यावर जिरं हिंग हळद आणि बराचसा ताजा कढीपत्ता घालावा. कढीपत्ता जळला नाही पाहिजे.
- फोडणी थंड करत कशी ठेवावी. थंड झाल्यानंतर डाळकैरीच्या मिश्रणावर ओतून पूर्ण मिक्स करावी. थोडीशी कोथिंबीर घातल्यास अजून सुंदर दिसते.
ओले खोबरे घातलं असल्यामुळे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आंब्याची डाळ जास्त वेळ बाहेर काढून ठेवू नये. शक्यतो फ्रिजमध्ये ठेवावी.
डाळकैरी नुसतीही खाता येते किंवा कोशिंबीर म्हणूनही वापरता येते.
कैरीच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.