Tags: कैरीचा टक्कू, तक्कु, kairichi chatni, kairiche lonche, Kairi taku takkoo, raw mango recipes

कैरीपासून भाजी, कोशिंबीर, चटणी असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवता येतात. 
कैरी किसून त्याचे जे टेम्पररी लोणचे बनवले जाते त्याला टक्कू किंवा तक्कु म्हणतात. 

कैरीच्या टक्कूसाठी लागणारे साहित्य: 

हिरव्यागार कैऱ्या - साधारण तीन ते चार 

गुळ - वाटीभर परंतु कैरीचा आंबटपणा वर त्याचे प्रमाण अवलंबून असते.
काश्मिरी तिखट 
मेथीचे दाणे 
तेल मोहरी जिरे हिंग हळद मीठ 

कैरीच्या टक्कूची रेसिपी 

  • सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन कोरड्या पुसून घ्याव्यात. त्यांच्या देठाशी असलेल्या चिकटपणा पूर्ण निघून गेला पाहिजे. 
  • निवडताना शक्‍यतो आंबट असलेल्याच निवडाव्यात. कारण आंबट गोड प्रकारच आहे. आपल्याला कैरी किसायची असल्यामुळे कैऱ्या कडक असाव्यात. 
  • कैरीची साले काढून टाकावी. 
  • कैरीच्या आत असलेल्या कोयीचा अंदाज घेऊन कैरी किसावी. कैरीची कोय किसू नये, त्यामुळे कडवटपणा येतो. 
  • त्यानंतर आंबटपणाचा अंदाज घेऊन त्यात किसलेला गूळ मिसळावा. गुळाचे प्रमाण कैरीच्या प्रमाणापेक्षा निश्चितच कमी ठेवावे. 
  • हे मिश्रण नीट  ढवळून साधारण वीस मिनिटे झाकून ठेवावे. 
  • यात मीठ घालू नये कारण त्यामुळे जास्तीचे पाणी सुटते. 
  • वीस मिनिटानंतर गुळ आणि कैरी बऱ्याच अंशी एकजीव झालेली दिसेल. शिवाय थोडे पाणी सुटले असेल. 
  • त्यात मीठ घालून ढवळावे. 
  • मिठानंतर तिखट घालावे परंतु ढवळू नये. तिखट मिश्रणाच्या वर तसेच राहू द्यावे. 
  • एका छोट्या कढल्यात फोडणीसाठी तेल घ्यावे. मोहरी घालून तडतडली की त्यात मेथीदाणे घालावेत. काहीजण मेथीची पूड वापरतात. त्यापेक्षा मेथीच्या दाण्याने जास्त चांगली चव येते.
  • त्यानंतर जिरे, हिंग आणि जराशी हळद घालावी.
  • ही फोडणी मिश्रणावर असलेल्या तिखटावर ओतावी. 
  • असे केल्याने तिखटाचा रंग बदलत नाही, काळा पडत नाही. शिवाय तिखट एकदम घशात जाऊन ठसकाही लागत नाही. 
  • फोडणी दिल्यानंतर ते मिश्रण नीट व्यवस्थित ढवळावे. आणि काही वेळ तसेच ठेवावे जेणेकरून ते थंड होईल. 

अशाप्रकारे अगदी पाच मिनिटात कैरीचा टक्कू तयार होतो. 
यात पाणी अजिबात नसल्यामुळे साधारण तीन ते चार दिवस ही कैरीची चटणी बाहेर टिकते. परंतु शक्यतो तरीही फ्रीजमध्ये ठेवावी. 
कैरीचे साठवणुकीचे लोणचे, कैरीची चटणी, मेथांबा, कैरीच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा. 


Tags: कैरीचा टक्कू, तक्कु, kairichi chatni, kairiche lonche, Kairi taku takkoo, raw mango recipes

Related Posts:

  • कैरीचं रायतं, मेथांबा, कोयाडं, कैरीची चटणी, Methamba Tags: कैरीचं रायतं, मेथांबा, कोयाडं, कैरीची चटणी, Methamba, kairi raita, koyada, raw mango chatani Methamba  उन्हाळ्यात कैऱ्या मिळू लागल्यावर हमखास बनवला जाणारा पदार्थ! English version available at - … Read More
  • कैरीचा टक्कू, कैरी तक्कु, Raw Mango Takku, Kairicha takku Tags: कैरीचा टक्कू, तक्कु, kairichi chatni, kairiche lonche, Kairi taku takkoo, raw mango recipes कैरीपासून भाजी, कोशिंबीर, चटणी असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवता येतात.  कैरी किसून त्याचे जे टेम्पररी लोणचे बनवले जा… Read More
  • कैरी लोणचे Mango pickle Tags: Kachha aam achar, kairi lonche, kairiche lonache, raw mango pickle recipe in marathi, कैरीचं लोणचं, आंबा लोणचे  कैरीचं लोणचं अनेक प्रकारांनी करता येतं. माझी आई ज्या ज्या प्रकारे करायची त्यातल्या त्यात मला ही… Read More
  • आंब्याची डाळ, आंबेडाळ, कैरीची डाळ, डाळकैरी, Ambyachi daal, Ambedaal Tags: आंब्याची डाळ आंबेडाळ कैरीची डाळ डाळकैरी, ambyachi dal, ambe dal, daalkairi recipe चैत्रगौरीच्या नवरात्रीला हमखास बनवला जाणारा हा पदार्थ आहे. चैत्र महिन्यात बाजारात कैर्‍या येऊ लागतात.  आंब्याच्या डाळीसाठी लागणार… Read More

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.