Tags: rawa idli, instant idli, instant rava idali, semolina idli, ravyachi रव्याची इन्स्टंट इडली,रव्याच्या इडल्या, रवा इडली, रव्याची इन्स्टंट इडली, idli recipe in marathi  

rawa idli, instant idli, instant rava idali, semolina idli, ravyachi रव्याची इन्स्टंट इडली,रव्याच्या इडल्या, रवा इडली, रव्याची इन्स्टंट इडली
Instant Rava Idli
अचानक इडल्या करायच्या झाल्यास किंचित सोडा किंवा इनो किंवा आंबट दही घालून इन्स्टंट इडल्या करता येतात. परंतु थोडे आधीच ठरवून आंबवलेल्या पिठाच्या इडल्या जास्त पौष्टिक असतात. झटपट इडल्यांसाठी किंवा कोणत्याही रवा इडलीसाठी नेहमी बारीक रवाच वापरावा.

आंबवून केलेल्या पिठाच्या इडल्यांसाठी लिंकवर दुसरी पोस्ट लिहिली आहे.
इथे झटपट इडल्या कशा करायच्या  ते पाहू. 
याचप्रमाणे या पिठाचे इन्स्टंट डोसे करता येतात. 
इन्स्टंट इडल्या आणि इन्स्टंट डोसे यांची बेसिक कृती सारखीच आहे.


इन्स्टंट रवा इडली साहित्य :

३ वाट्या बारीक रवा 
१ वाटी उडीद डाळ 
१ वाटी आंबट दही 
अर्धा चमचा इनो (फ्रुट सॉल्ट)
मीठ 
तेलाची फोडणी - ऐच्छिक 

रव्याच्या इन्स्टंट इडलीची कृती :

  • अर्धी वाटी उडीद डाळ गरम पाण्यात अर्धा तास भिजवावी. 
  • बारीक रवा अर्धा तास बेताच्या पाण्यात  मिश्रण थलथलीत असावे.
  • उडीद डाळ बारीक वाटावी. थांबून थांबून वाटल्याने ती हलकी होते. 
  • बारीक रवा मिक्सरमध्ये वाटावा. 
  • उडदाची पेस्ट, रवा, नाचणी एकत्र एकजीव करावे. त्यात वाटीभर आंबट दही आणि अंदाजे मीठ घालून ढवळावे. 
  • इनो किंवा सोडा यापैकी काहीही एक चालेल. शक्यतो इनोच बरं कारण कधी कधी सोड्याला वास येतो. 
  • इनो फार जुने नसावे. अर्धा चमचा इनो घालून ढवळल्यावर तेल लावलेल्या इडली पात्रात १५ मिनिटे इडल्या वाफवाव्यात. 
  • आवडत असल्यास, इनो घालून झाल्यावर, तेल+मोहरी+कढीपत्ता+हिंग अशी फोडणी करून मिश्रणात घालावी. 
कोणत्याही चटणीबरोबर या इडल्या छान लागतात.

Tags: rawa idli, instant idli, instant rava idali, semolina idli, ravyachi रव्याची इन्स्टंट इडली,रव्याच्या इडल्या, रवा इडली, रव्याची इन्स्टंट इडली, idli recipe in marathi

Related Posts:

  • ब्रेड पोटली, Bread Potali Tags: Bread Potali, Stuffed bread pakora, Stuffed bread pakoda recipe in marathi. साहित्य:  बटाटे -  भाजीसाठी मोड आलेली कडधान्ये, टोमॅटो, कोबी, मटार, गाजर, बीट  वगैरे बेसन, तेल तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा,… Read More
  • पातळ पोह्यांचा चिवडा, Pohyancha Chivda Tags: Rice flakes Chiwda patal pohyancha chivada chiva da recipe in marathi चिवडा, दिवाळीचा फराळ, chiwada, भाजलेल्या पोह्यांचा चिवडा, bhajake pohe chivda, yellow chivda पोह्याच्या चिवड्याचे साहित्य: पातळ पोहे - अर्धा किलो&… Read More
  • व्हेज ब्रेड पकोडे, Bread Pakoda, Veg Bread Pakoda, Bread Pattice Tags: Veg Bread Pakoda Pakora Bread Pattice recipe in marathi हासुद्धा एक सहजपणे सर्वत्र उपलब्ध पदार्थ आहे. ब्रेडच्या पदार्थांशिवाय स्नॅक्स काउंटर पूर्ण होत नाही.  साहित्य: बटाटे - उकडून भाजी ब्रेड, बेसन, तेल  त… Read More
  • व्हेज टोस्ट सॅन्डविच, Veg Toast Sandwich Tags: Veg toast sandwich recipe in marathi Veg Grill sandwich, सँडविच, टोस्ट सँडविच ग्रील्ड सँडविच ग्रील  कुठेही सहज उपलब्ध असणारा हा पदार्थ आहे. लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे हा. सँडविच असल्याने मुलं खुश, आण… Read More
  • बटाटावडा, वडापाव, Batata Vada, Vada Pav Tags: Vadapav Batata Vada Batatavada Aloo vada recipe in marathi,बटाटावडा, वडापाव बटाटावडा किंवा वडापाव या शब्दांची जादूच अशी आहे कि पंचपक्वान्नांनी पोट भरलेलं  भूक लागते. हा पदार्थ गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न मा… Read More

2 comments:

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

522,257

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.